expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> PRTutorial Marathi essay: July 2020

Friday, July 17, 2020

Marathi Essay on Gurupournima



गुरुपौर्णिमा

गुरुर्ब्र्म्हा गुरुर्विष्णू: गुरु दैवो महेश्वरा : |

गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: |

        

         गुरु म्हणजेच ब्रम्ह, गुरु म्हणजेच विष्णू, गुरु म्हणजेच शिव व गुरु म्हणजेच साक्षात परब्रह्म अशा या ईश्वररूपी गुरूंना माझा नमस्कार असो. आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. मराठी महिन्यातील आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी   केली जाते.

गुरु म्हणजे कोण

Who is Guru?

          गुरु म्हणजे मार्गदर्शक. आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा मार्ग दाखवणारे ते गुरु. आपले जीवन घडवणारे, आपल्यावर योग्य संस्कार करणारेआपल्याला योग्य मार्ग दाखवणारे. आपल्यामध्ये शक्तीचा संचार करून कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत देणारे गुरुच असतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजेच आपले मातापिता होत. आपले संगोपन करतात. आपल्याला बोलायला, चालायला शिकवतात. हाताला धरून उठवतात. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी चांगल्या शाळेत घालतात. अशा प्रकारे आपले आईवडील आपली काळजी घेतात. त्यामुळे आपले आईवडील आपले प्रथम गुरु होत. आपल्याला शिकवणारे शिक्षक हे सुद्धा आपले गुरुच होत. आपण त्यांच्या सान्निध्यात दिवसातील काही तासच असतो. परंतु शालेय शिक्षणाबरोबर ते आपल्याला इतरही ज्ञान देतात. म्हणून प्रत्येक शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांना फुलांचा गुच्छ, भेटवस्तू, मिठाई इ. वस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात.

गुरूचा इतिहास : 

History of Guru

        गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही

 म्हणतात. व्यासऋषींनी वेदांचे ज्ञान सर्व

 जगाला दिले. त्याच प्रमाणे त्यांनी

महाभारत हा पवित्र ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून त्यांनी जीवनाचे रहस्य सर्वांना समजावले. म्हणूनच ते आद्यगुरू होत. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रथम व्यास ऋषींचे पूजन केले जाते.

मानवी जीवनात गुरुची आवश्यकता :

(Need of Guru in human life)

          प्रत्येक माणसाला कसली ना कसली तरी चिंता भेडसावत असते. जीवनात ज्यावेळी सुख येते त्यावेळी माणूस आनंदी होतो. आपल्या सुखात हुरळून जातो. पण एखादे वेळेस वाईट प्रसंग आला तर मात्र तो मनाने खचून जातो. आपल्यावर हा प्रसंग का आला? या प्रश्नाचे उत्तर शोधू लागतो. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. काही जणांच्या मनात अशा वेळी वाईट विचार येऊ लागतात तर काही माणसे व्यसनाधीन होतात. परंतु अशा बिकट प्रसंगी जर एखादा योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक मिळाला तर माणसाला कुठच्याही प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मिळते व तो सुख किंवा दु:ख या दोन्ही प्रसंगी मनाचा समतोल राखू शकतो. म्हणूनच धावपळीच्या या मानवी जीवनाला गुरूंची आवश्यकता आहे.

खरा गुरु कोण

Who is the Real Guru?


          खरा गुरु तोच असतो जो आपल्या शिष्याला प्रपंच सांभाळून त्याची उन्नती व अद्यात्मिक प्रगती कशी होईल? यासाठी त्याला योग्य ती साधना देतात. त्याचप्रमाणे शिष्य सुद्धा आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे आचरण करतो व नम्रपणे वागतो. तोच शिष्य गुरुचाआशिर्वाद संपादन करतो. अशा प्रकारे गुरु आपल्या शिष्याला ईश्वरी रूपात  वेळोवेळी मदत करतात. जो गुरु निस्वार्थी, निरपेक्ष राहून शिष्यांना मदत करतो तोच खरा गुरु होय.

          आजकाल समाजामध्ये गल्लोगल्ली बरेच बुवा, गुरु सापडतात. एखाद्या संकटात असलेल्या माणसाला एखादा उपाय सांगून काहीतरी विधी करण्यासाठी पैसे मागतात. अशा प्रकारे भरकटलेला माणूस आपले काम होईल या इच्छेने आपला वेळ व पैसा वाया घालवतात. त्यामुळे आपण ज्यांना गुरु मानतो त्याची योग्यता पडताळून घेणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच मित्रांनो, सावधान! कुणालाही गुरु मानून कुठल्याही बुवांच्या नादी लागू नका, सत्कर्म करा. या विश्वात एक अद्भुत शक्ती आहे तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ती शक्ती आपल्याला योग्य गुरुच्या सहवासात प्राप्त होते. अशा प्रकारे गुरुपौर्णिमा आपल्या इष्ट गुरूचे पूजन करून त्यांच्या उपदेशाप्रमाणे आचरण करा व इतरांना सहाय्य करा.        
                             
               गुरुपौर्णिमा


English Translation


Gurupournima

Gururbrahma Gururvishnu: Guru Daivo Maheshwara: |

Guru: Sakshatparbrahm Tasmai Srigurve Nama: |
     
 Guru is Brahma, Guru is Vishnu, Guru is Shiva and Guru is Parabrahma. Gurupournima is a day to express gratitude to your Guru. Gurupournima is celebrated on the full moon day of the Marathi month of Ashadh.

Who is Guru?

     Guru(Teacher) is the guide. He is the Guru who shows us the path of knowledge from the darkness of ignorance. The ones who shape our lives, the ones who nurture us, the ones who show us the right path. We have gurus who dare to face any situation by transmitting power to us. The first Guru in the life of each of us was our parents. They take care of you. They teach you to walk. They hold our hands and to get up if we fell down. They send their children to good schools so that they can get a good education. This is how your parents take care of you. So our parents became our first gurus. The teacher who taught us was also our guru. We spend only a few hours a day with them. But along with school studies, they give us other knowledge too. So Gurupournima is celebrated in every school. On this day, students are given bouquets of flowers, gifts, sweets, etc to their teacher. They are honored by giving things.

History of Guru:

   Gurupournima is also called Vyaspoornima. Vyasarishi gave the knowledge of Vedas to all the world. In the same way, he wrote the holy book 'Mahabharat'. Through this book, he explained the secret of life to everyone. That is why he became Adyaguru.(the first Guru) That is why the first Vyas sage is worshiped on the day of Gurupournima.

Need of Guru in human life:

        Every human being has some kind of anxiety. Man is happy when there is happiness in life. He is overwhelmed by his happiness. But when bad things happen to him, he gets depressed. Why did this happen to you? The answer to this question begins to be found. He can't find the answer to his question. Some people have bad thoughts at such times, while others become addicted. But in such a difficult situation, if a guide is found to show the right path, a person gets the courage to face any situation and he can balance the mind in both happiness and sorrow. That is why this fast-paced human life needs a Guru.

Who is the Real Guru?
     
 The real Guru is the one who takes care of his disciple's world and how will he progress and progress? They give him the right tools for this. In the same way, the disciple also obeys his master and behaves humbly. The same disciple acquires the Guru's blessing. Thus the Guru helps his disciple from time to time in the divine form. The true Guru is the one who helps the disciples selflessly and impartially.

        In today's society, there are many Gurus in so many places. They ask for money to perform a ritual by telling a man in trouble a solution. Thus the wanderer wastes his time and money in the hope that his work will be done. Therefore, it is very important to verify the merits of those whom we consider being gurus. So friends, beware! Do not follow the advice of any person as a guru, do good deeds. Try to know that there is a wonderful power in this universe. That power we get in the company of the right Guru. In this way, celebrate Gurupournima by worshipping your respected Guru and follow his teachings and help others.

Saturday, July 4, 2020

Story on Asel Jithe Ichcha Asel Tithe Marg



 Story on Asel Jithe Ichcha Asel Tithe Marg



दिलेल्या शीर्षकवरुन गोष्ट लिहा.

असेल जिथे इच्छा असेल तिथे मार्ग

A story on ‘Where there

 is a will there is a way’

        आकूर नावाचे एक गाव होते. त्या गावात राहुल नावाचा एक मुलगा त्याच्या आईसोबत राहत असे. त्याची आई शेतात मोल मजुरी करत असे. राहुलही कधी कधी आईला तिच्या कामात मदत करत असे. राहुल सातवी इयत्तेत शिकत होता. अभ्यासात तो हुशार होता. एकदा त्याला कळले की शेजारच्या गावात तीन दिवसकरिता पुस्तक प्रदर्शन भरले आहे. राहुलला त्या प्रदर्शनात जाण्याची फार इच्छा होती. त्याचे काही मित्र प्रदर्शनात जाऊन आले. त्यांनी संगितले की प्रदर्शनात वेगवेगळ्या विषयावरची खूप छान पुस्तके आहेत. तसेच पुस्तके विक्रीसाठी ठेवली आहेत. राहुलला ते ऐकून फार आनंद झाला. त्याने आईला, प्रदर्शनात जाऊ का? असे विचारले. आईने नकार दिला. ती म्हणाली,”आपल्याकडे तुझ्या सोबत जायला कुणी मोठ माणूस नाही तसेच पुस्तक विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसेही नाहीत.”

        राहुल खिन्न झाला तो चालत चालत घरापासून दूर अंतरावर असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसला. त्याला वाईट वाटत होते. पण काय करणार? इतक्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला. झाडामागे कुणीतरी असल्याचा भास झाला. त्याने मागे पहिले तर त्याला दिव्य प्रकाश दिसला. त्याला आश्चर्य वाटले. त्या प्रकाशातून एक सुंदर परी प्रकट झाली. ती म्हणाली, “राहुल घाबरू नकोस. मी एक परी आहे. तू एवढा दु:खी का दिसत आहेस?” राहुलने तिला घडलेली हकीकत सांगितली. परी म्हणाली, ”मी तुझी इच्छा पूर्ण करीन. पण तुला एक परीक्षा द्यावी लागेल. त्यात तू पास झालास तर मी तुला मदत करीन.” राहुलने विचारले, “माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी परीक्षा द्यायला तयार आहे. परी म्हणाली, “ठीक आहे. उद्या तू मला याच झाडाखाली भेट. असे म्हणून परी निघून गेली.

        दुसर्‍या दिवशी राहुल पुन्हा परीला भेटण्यासाठी निघाला. जाताना रस्त्यात त्याला लाल रंगाच्या मखमली कपड्यात बांधलेली एक वस्तू सापडली. त्याने ती उचलली व ही कोणाची वस्तू असेल म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला. वस्तू खूप आकर्षक होती. त्याला रस्त्यात एक व्यक्ती दिसली ती व्यक्ती काहीतरी शोधत असल्याचे त्याच्या लक्षात आले. राहुल लगेचच त्याच्याजवळ गेला व त्याने विचारले, “काका, आपण काही शोधत आहात का?” ते म्हणाले, ”हो, माझी एक वस्तू हरवली आहे.” राहुलने त्यांना त्याच्याजवळची वस्तू दाखवली नाही. त्याने विचारले, तुमची हरवलेली वस्तू काशी दिसते?” ते म्हणाले, ती वस्तू लाल मखमली कपड्यात बांधलेली आहे”. खात्री पटल्यावर राहुलाने ती वस्तू त्यांना दाखवली. त्यावर त्यांनी ती वस्तू त्यांचीच असल्याचे संगितले. राहुलने ती वस्तू त्यांना देऊ केली तर ते म्हणाले, “ही वस्तू तुला बक्षीस म्हणून ठेव.” राहुल गोधळला. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून परीच होती. परी राहुलला म्हणाली, ”राहुल, तू परीक्षेत पास झाला आहेस. मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. हे बक्षीस तू ठेव. तुझी इच्छा पूर्ण होईल.” राहुल खूप खुश झाला व परीचे आभार मानून घरी गेला. घरी गेल्यावर त्याने आईला सर्व हकीकत सांगितली. त्याने आईला बक्षीस दाखवले. त्याने ते उघडून पाहिले तर त्या कपड्यात पैसे होते. राहुलच्या आईलाही फार आनंद झाला. राहुल आपल्या आईबरोबर आनंदाने प्रदर्शन पाहायला गेला. राहुलने खूप पुस्तके विकत घेतली. राहुलची इच्छा पूर्ण झाली. मोठे झाल्यावर राहुलने तर वाचनालयच उघडले.

तात्पर्य : इच्छा प्रबळ असेल तर मार्ग नक्कीच मिळतो.

==========================================

                              Translation in English

A story on ‘Where there

 is a will there is a way’

       There was a village called Akur. In that village, a boy named Rahul lived with his mother. His mother worked in the fields. Rahul also sometimes helped his mother in her work. Rahul was studying in 7th standard. He was smart in his studies. Once he found out that the neighboring village was full of book exhibitions for three days. Rahul wanted to go to that exhibition. Some of his friends went to the exhibition. They told that there are many nice books on different topics in the exhibition. Also, books are kept for sale. Rahul was very happy to hear that. He asked his mother, "Shall we go to the exhibition?" The mother refused. She said, "There is no elder person to go with you, and you don't have enough money to buy the  books."


        Rahul became depressed. He walked and sat under a tree at a distance from the house. He was feeling bad. But what to do? Suddenly he heard a voice. There seemed to be someone behind the tree. When he looked back, he saw divine light. He was surprised. Out of that light, a beautiful fairy appeared. She said, "Rahul, don't be afraid. I am a fairy. Why do you look so sad? ” Rahul told her the fact. The fairy said, "I will fulfill your wish. But you have to give a test. If you pass, I will help you. ” Rahul replied, "I am ready to give the exam to fulfill my wish. The fairy said, “Okay. Tomorrow you will visit me under this tree and the fairy left.

        The next day, Rahul went to see the fairy again. On the way, he found an object wrapped in red velvet. He picked it up and looked around to see whose object it was. The objects were very attractive. He saw a man on the street and he noticed that the man was looking for something. Rahul immediately approached him and asked, "Uncle, are you looking for something?" He said, "Yes, I have lost one thing." Rahul did not show them anything near him. He asked, "What does your lost object look like?" "The object is wrapped in red velvet," he said. Rahul showed them the item with him. He said the item was his. When Rahul offered it to them, they said, "Keep it as a reward." Rahul was confused. That person was no other than a fairy itself. The fairy said to Rahul, "Rahul, you have passed the exam. I am very happy for you. You keep this reward. Your wish will come true. ” Rahul was very happy and went home thanking the fairy. When he returned home, he told his mother all the facts. He showed the mother the prize. He opened it and saw that there was money in it. Rahul's mother was also very happy. Rahul happily went to see the exhibition with his mother. Rahul bought a lot of books. Rahul's wish came true. When he grew up, Rahul opened a library.

Moral of the story :
 If the desire is strong, the path is definitely found.