expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> PRTutorial Marathi essay: Story on Asel Jithe Ichcha Asel Tithe Marg

Saturday, July 4, 2020

Story on Asel Jithe Ichcha Asel Tithe Marg



 Story on Asel Jithe Ichcha Asel Tithe Marg



दिलेल्या शीर्षकवरुन गोष्ट लिहा.

असेल जिथे इच्छा असेल तिथे मार्ग

A story on ‘Where there

 is a will there is a way’

        आकूर नावाचे एक गाव होते. त्या गावात राहुल नावाचा एक मुलगा त्याच्या आईसोबत राहत असे. त्याची आई शेतात मोल मजुरी करत असे. राहुलही कधी कधी आईला तिच्या कामात मदत करत असे. राहुल सातवी इयत्तेत शिकत होता. अभ्यासात तो हुशार होता. एकदा त्याला कळले की शेजारच्या गावात तीन दिवसकरिता पुस्तक प्रदर्शन भरले आहे. राहुलला त्या प्रदर्शनात जाण्याची फार इच्छा होती. त्याचे काही मित्र प्रदर्शनात जाऊन आले. त्यांनी संगितले की प्रदर्शनात वेगवेगळ्या विषयावरची खूप छान पुस्तके आहेत. तसेच पुस्तके विक्रीसाठी ठेवली आहेत. राहुलला ते ऐकून फार आनंद झाला. त्याने आईला, प्रदर्शनात जाऊ का? असे विचारले. आईने नकार दिला. ती म्हणाली,”आपल्याकडे तुझ्या सोबत जायला कुणी मोठ माणूस नाही तसेच पुस्तक विकत घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसेही नाहीत.”

        राहुल खिन्न झाला तो चालत चालत घरापासून दूर अंतरावर असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसला. त्याला वाईट वाटत होते. पण काय करणार? इतक्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला. झाडामागे कुणीतरी असल्याचा भास झाला. त्याने मागे पहिले तर त्याला दिव्य प्रकाश दिसला. त्याला आश्चर्य वाटले. त्या प्रकाशातून एक सुंदर परी प्रकट झाली. ती म्हणाली, “राहुल घाबरू नकोस. मी एक परी आहे. तू एवढा दु:खी का दिसत आहेस?” राहुलने तिला घडलेली हकीकत सांगितली. परी म्हणाली, ”मी तुझी इच्छा पूर्ण करीन. पण तुला एक परीक्षा द्यावी लागेल. त्यात तू पास झालास तर मी तुला मदत करीन.” राहुलने विचारले, “माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी परीक्षा द्यायला तयार आहे. परी म्हणाली, “ठीक आहे. उद्या तू मला याच झाडाखाली भेट. असे म्हणून परी निघून गेली.

        दुसर्‍या दिवशी राहुल पुन्हा परीला भेटण्यासाठी निघाला. जाताना रस्त्यात त्याला लाल रंगाच्या मखमली कपड्यात बांधलेली एक वस्तू सापडली. त्याने ती उचलली व ही कोणाची वस्तू असेल म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला. वस्तू खूप आकर्षक होती. त्याला रस्त्यात एक व्यक्ती दिसली ती व्यक्ती काहीतरी शोधत असल्याचे त्याच्या लक्षात आले. राहुल लगेचच त्याच्याजवळ गेला व त्याने विचारले, “काका, आपण काही शोधत आहात का?” ते म्हणाले, ”हो, माझी एक वस्तू हरवली आहे.” राहुलने त्यांना त्याच्याजवळची वस्तू दाखवली नाही. त्याने विचारले, तुमची हरवलेली वस्तू काशी दिसते?” ते म्हणाले, ती वस्तू लाल मखमली कपड्यात बांधलेली आहे”. खात्री पटल्यावर राहुलाने ती वस्तू त्यांना दाखवली. त्यावर त्यांनी ती वस्तू त्यांचीच असल्याचे संगितले. राहुलने ती वस्तू त्यांना देऊ केली तर ते म्हणाले, “ही वस्तू तुला बक्षीस म्हणून ठेव.” राहुल गोधळला. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून परीच होती. परी राहुलला म्हणाली, ”राहुल, तू परीक्षेत पास झाला आहेस. मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. हे बक्षीस तू ठेव. तुझी इच्छा पूर्ण होईल.” राहुल खूप खुश झाला व परीचे आभार मानून घरी गेला. घरी गेल्यावर त्याने आईला सर्व हकीकत सांगितली. त्याने आईला बक्षीस दाखवले. त्याने ते उघडून पाहिले तर त्या कपड्यात पैसे होते. राहुलच्या आईलाही फार आनंद झाला. राहुल आपल्या आईबरोबर आनंदाने प्रदर्शन पाहायला गेला. राहुलने खूप पुस्तके विकत घेतली. राहुलची इच्छा पूर्ण झाली. मोठे झाल्यावर राहुलने तर वाचनालयच उघडले.

तात्पर्य : इच्छा प्रबळ असेल तर मार्ग नक्कीच मिळतो.

==========================================

                              Translation in English

A story on ‘Where there

 is a will there is a way’

       There was a village called Akur. In that village, a boy named Rahul lived with his mother. His mother worked in the fields. Rahul also sometimes helped his mother in her work. Rahul was studying in 7th standard. He was smart in his studies. Once he found out that the neighboring village was full of book exhibitions for three days. Rahul wanted to go to that exhibition. Some of his friends went to the exhibition. They told that there are many nice books on different topics in the exhibition. Also, books are kept for sale. Rahul was very happy to hear that. He asked his mother, "Shall we go to the exhibition?" The mother refused. She said, "There is no elder person to go with you, and you don't have enough money to buy the  books."


        Rahul became depressed. He walked and sat under a tree at a distance from the house. He was feeling bad. But what to do? Suddenly he heard a voice. There seemed to be someone behind the tree. When he looked back, he saw divine light. He was surprised. Out of that light, a beautiful fairy appeared. She said, "Rahul, don't be afraid. I am a fairy. Why do you look so sad? ” Rahul told her the fact. The fairy said, "I will fulfill your wish. But you have to give a test. If you pass, I will help you. ” Rahul replied, "I am ready to give the exam to fulfill my wish. The fairy said, “Okay. Tomorrow you will visit me under this tree and the fairy left.

        The next day, Rahul went to see the fairy again. On the way, he found an object wrapped in red velvet. He picked it up and looked around to see whose object it was. The objects were very attractive. He saw a man on the street and he noticed that the man was looking for something. Rahul immediately approached him and asked, "Uncle, are you looking for something?" He said, "Yes, I have lost one thing." Rahul did not show them anything near him. He asked, "What does your lost object look like?" "The object is wrapped in red velvet," he said. Rahul showed them the item with him. He said the item was his. When Rahul offered it to them, they said, "Keep it as a reward." Rahul was confused. That person was no other than a fairy itself. The fairy said to Rahul, "Rahul, you have passed the exam. I am very happy for you. You keep this reward. Your wish will come true. ” Rahul was very happy and went home thanking the fairy. When he returned home, he told his mother all the facts. He showed the mother the prize. He opened it and saw that there was money in it. Rahul's mother was also very happy. Rahul happily went to see the exhibition with his mother. Rahul bought a lot of books. Rahul's wish came true. When he grew up, Rahul opened a library.

Moral of the story :
 If the desire is strong, the path is definitely found.

No comments: