expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> PRTutorial Marathi essay: Marathi Essay on Shalechya Ghanteche aatmavrutta

Monday, June 29, 2020

Marathi Essay on Shalechya Ghanteche aatmavrutta


Marathi Essay on Shalechya Ghanteche aatmavrutta


                                                                       


शाळेच्या घंटेचे आत्मवृत्त


(Autobiography of the

School bell)


        आज परीक्षेचा शेवटचा पेपर होता. शाळेला सुट्टी लागणार होती, पेपर संपला व आम्ही सर्व मैत्रिणी व्हरांड्यात उभे होतो. तिथे आमच्या शाळेची मोठी घंटा आहे. आम्ही सर्वजणी बोलत होतो. कारण आम्ही सर्वजणी सुट्टी संपल्यावर नवीन वर्गात भेटणार होतो. एवढ्यात आम्हाला घंटेचा आवाज आला. आम्हाला वाटले वार्‍यामुळे घंटा हलली असावी म्हणून आम्ही घंटेकडे पहिले तर घंटा प्रत्यक्ष बोलू लागली.

        घंटा म्हणाली,” घाबरू नका. मीच आवाज केला. तुमचं बोलणं मी ऐकल. तुम्हाला सुट्टी पडली म्हणून तुम्ही खूप आनंदात आहात. पण तुम्ही मैत्रिणी सुट्टीमध्ये एकमेकांना भेटणार नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटते. पण तुम्ही विद्यार्थी ज्यावेळी घरी असता त्यावेळी मात्र मला खूप एकटेपणा जाणवतो. शाळेतील शिक्षकसुद्धा पेपर तपासून झाल्यावर सुट्टीवर जातात. मग मात्र मला खूपच एकट वाटत. या दरम्यान माझे काहीच काम नसत. मी मात्र तुम्हा सर्वांची आठवण काढत असते. मला हा एकटेपणा सहन होत नाही. कधी एकदा सुट्टी संपते व शाळा सुरू होते असे मला सतत वाटत राहते.

        मला माझ्या कामाबद्दल खूपच अभिमान आहे. तुम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनात तर माझे महत्वाचे स्थान आहे. तुम्ही रोज शाळेत येता पण घंटा वाजायच्या आत तुम्ही शाळेत पोहोचता. त्यानंतर प्रार्थनेची वेळ सुरू होते तीही घंटा नादाने. एक तास संपला की पुन्हा माझा उपयोग होतो. एखादा कंटाळवाणा तास असला किंवा अभ्यास करायचा कंटाळा आला की तुम्ही सर्वजण कधी एकदा घंटा वाजते व हा कंटाळवाणा तास कधी संपतो याची वाट पाहत असता. अभ्यास करून कंटाळा येतो, भूक लागते तेव्हा तुम्हाला माझी खूपच आठवण येते. माझा आवाज आला की तुम्ही खुश होता. तुम्ही डबा खाता, मैदानावर खेळता, मस्ती करता परंतु जेव्हा तुम्हाला माझा आवाज येतो त्यावेळी मात्र तुम्हाला घंटा इतक्या लवकर का वाजली? असे वाटू लागते. पण मी माझे काम प्रामाणिकपणे व वेळेनुसार करते. त्यानंतर तुम्ही पुन्हा अभ्यास करता व शाळा कधी सुटते याची वाट बघता ज्यावेळी माझा आवाज येतो तेव्हा तुम्ही आनंदी होतो.

        अशा प्रकारे मी माझ कर्तव्य करत असते. पण मला तुमची इतकी सवय झाली आहे की सुट्टी पडली की मला फार वाईट वाटते. तुम्ही सर्वजण माझे सोबती आहात पण ठीक आहे. दरवर्षी प्रमाणे ही सुट्टी देखील मला एकटीलाच काढावी लागेल पण तुम्ही मात्र सुट्टीत खूप मजा करा. आनंदी रहा व लवकरात लवकर परत या.

        असे बोलून घंटा शांत झाली. कधी नव्हे ते आम्हाला शाळेच्या घंटेचे मनोगत आम्हाला समजले. घंटेबद्दल आमच्या मनात आदर निर्माण झाला. 
============================================================================

                                                  Translation in English 

              Autobiography of the School bell



            Today was the last paper of the exam. The school was about to break, the exams got over and we all friends stood in the veranda (passage). There is a big bell in our school. We were all talking. Because we were all going to meet in a new class when the holidays were over. Just then we heard some noise. We thought the wind must have moved the bell so we looked at the bell and the bell started speaking.

           The bell said, "Don't be afraid. I made a noise. I was listening to you. You're so happy to have a holiday. But you feel bad for not meeting each other during the vacation. But when you students are at home, I feel very lonely. School teachers also go on vacation after checking their papers. But then I feel very lonely. In the meantime, I had nothing to do. But I miss you all. I can't tolerate this loneliness. I always feel like when these holidays would over and school starts.
  
          I am very proud of my work. I have an important place in the lives of the students. You come to school every day before the bell ring. Then the prayer time starts with the ringing of the bell. After the 1st period, I was used again. Whether it's a boring hour or getting bored of studying, you all wait for the bell to ring once. When you are getting bored with studying or when you feel hungry you are eagerly waiting for me. when you heard my voice you feel very happy. You had your tiffin, play on the ground, have fun, but when you hear my voice you feel somewhat bad, why did the bell ring so early? It seems so. But I do my work honestly and on time. Then you study again and wait for school to leave. You are happy when my voice comes.

        That's how I do my duty. But I'm so used to you that I feel very bad about the holiday. You're all my friends, but that's fine. Like every year, I have to take this holiday alone but you have a lot of fun. Be happy and come back as soon as possible. ”

       The bell rang. At no time did we understand the psyche of the school bell. We developed a respect for the bell.

शाळेच्या घंटेचे आत्मवृत्त


(Autobiography of the 

School bell)

No comments: