रविवारची
सुट्टी नसती तर ......
रविवारची
सुट्टी नसती तर
(If there were no Sunday holiday)
रविवारची सुट्टी म्हणजे सगळ्यांचा
आरामाचा दिवस असतो. आठवडाभर काम केल्यानंतर कधी एकदा रविवार येतो याची सर्वजण
आतुरतेने वाट पाहत असतात. इतर कुठलीही सुट्टी असो पण ही रविवारची सुट्टी नसती तर
...... अशी कल्पनाच करवत नाही.
रविवारची सुट्टी म्हटली की लोकांचे खूप
बेत ठरलेले असतात. आठवडाभर काम करून काही
जणांना खूप थकवा आलेला असतो. त्यामुळे त्यांना सकाळी आरामात उठायचे असते व दिवसभर
आराम करायचा असतो. काही जणांना बाहेर
जायचे असते. काही जणांना कुठल्यातरी नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या घरी जायचे
असते तर काहींना एखाद्या सभारंभात जायचे असते. काहींना एखादी
खरेदी करायला बाहेर जायचे असते. काही जणांना बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचे असते
तर काही जणांना आठवड्याभराची कामे पूर्ण करायची असतात. काहींना अभ्यास पूर्ण करायचा
असतो तर काहींना खूप खेळायचे असते. पण रविवारची सुट्टीच जर नसेल तर याचा लहान थोर सगळ्यावरच
परिणाम होईल. त्यांना सतत कामे करावी लागल्यामुळे त्यांची चिडचिड होईल. त्यांचे त्यांच्या
रोजच्या कामातही लक्ष लागणार नाही. मुलांना खेळायला मिळणार नाही. कुणाला मनसोक्तपणे
कुठेही जाता येणार नाही. सगळ्यांची रोजची धावपळ होईल व ताणतणाव मात्र वाढेल. घरातील
वयस्कर लोकांनासुद्धा कंटाळा येईल कारण एक रविवारच असा असतो की ज्या दिवशी घरातील सर्वजण
एकत्र असतात. अशा प्रकारे रविवारची सुट्टी नसेल तर सर्वांवरच त्याचा विपरीत परिणाम
होईल.
रविवारची सुट्टी नसती तर याचा फायदा व्यावसायिकांना
झाला असता. उद्योगधंदे रोजच्या रोज चालू राहिले असते. कर्मचारी रविवारी कामावर आले
म्हणून त्यांना वेगळा मोबदला देण्याची गरज भासली नसती. उलट सुट्टी आहे, काम जास्त आहे, तुम्ही कामावर या असे सांगायची गरज भासणार
नाही. परंतु यात तोटा मात्र कर्मचार्यांचाच होईल. कारण त्यांना
जो महिन्याचा पगार मिळतो तो रविवारच्या सुट्टीचा मिळून असतो. पण रविवारची सुट्टीच नसेल
तर त्यांना रविवारी काम करून तेवढाच पगार मिळेल. पण दैनंदिन रोजगारावर काम करतात त्यांना
फायदा होईल. गृहीणींना मात्र विशेष फरक पडणार नाही. परंतु जर कोणी एखादी सुट्टी नसताना
सतत काम केले तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. विद्यार्थ्यांनासुद्धा शाळेत
रोज गेल्यामुळे मानसिक संतुलन बिघडू शकते. इतकेच काय त्यांना शाळेत जाण्याची किंवा
अभ्यास करण्याची इच्छा होणार नाही. आठवडाभर सतत काम केल्यानंतर मनाला व शरिराला आरामची
गरज असते. रविवारची सुट्टी ही प्रत्येकासाठी फार महत्वाची आहे. प्रत्येक माणसाला कामातून
विरंगुळा हवा असतो. काहींना आपला एखादा छंद जोपासायचा असतो किंवा
एखादे आवडीचे काम करायचे असते. त्यासाठी प्रत्येकाला आठवड्यातून एखाद्या सुट्टीची गरज
असते. म्हणून रविवारची सुट्टी ही महत्वाची आहे.
रविवारची सुट्टी नसती तर ....... ही कल्पना
करणेच अशक्य आहे. त्यामुळे रविवारची सुट्टी ही सर्वांना असलीच पाहिजे.
रविवारची सुट्टी नसती तर
(If there were no Sunday holiday)
===========================
English translation
Ravivarchi Sutti Nasati Tar
(If there were no Sunday holiday)
Sunday is a day off for everyone. After a week of work, everyone is eagerly awaiting the arrival of Sunday. Any other holiday but if it was not a Sunday holiday ...... I don't think so.
Sunday's holiday said people have a lot of plans. Some people get very tired after working all week. So they don't want to get up in the morning and rest all day. Some want to go out. Some want to go to a relative's or friend's house, while others want to go to a party. Some want to go out and buy something. Some want to go out to eat in the hotel, while others want to complete a week's work. Some want to complete the study, some want to play a lot. But if it is not a Sunday holiday, it will affect everyone. They will be irritated because they have to work constantly. They will not even pay attention to their daily work. Kids won’t get to play. No one can go anywhere willingly. Everyone will be in a daily rush and stress will increase. Older people in the house will also get bored because there is only one Sunday when everyone in the house is together. Thus, if there is no Sunday holiday, it will have an adverse effect on everyone.
Had it not been for the Sunday holiday, it would have benefited the business community. The business would have continued on a daily basis. Employees came to work on Sunday so they would not have to be paid extra compensation. On the contrary, it is a holiday, there is a lot of work, you don't have to say come to work. But the loss will be borne by the employees. Because of the monthly salary, they get a salary including the Sunday holiday. But if there is no Sunday holiday, they will get the same salary by working on Sunday. But those who work on a daily basis will benefit. Housewives, however, will not be particularly affected. But if one is constantly working without a holiday, it will have an adverse effect on one's health. Even going to school every day can upset the mental balance of the students. What's more, they won't want to go to school or study. After working continuously for a week, the mind and body need rest. Sunday is a very important holiday for everyone. Everyone wants to be free from work. Some want to pursue a hobby or any interesting work one likes to do. Everyone needs a week off for that. So Sunday is an important holiday.
No comments:
Post a Comment