expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> PRTutorial Marathi essay: Marathi Essay on Television curse or boon

Sunday, June 7, 2020

Marathi Essay on Television curse or boon

Marathi Essay on दूरदर्शन शाप की वरदान



दूरदर्शन शाप की वरदान

         विज्ञान व तंत्रज्ञानाने आपल्याला मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. ते म्हणजे दूरदर्शन अगदी लहान मुलांपासून ते
आबालवृद्धापर्यन्त सर्व जणांचे मनोरंजन होते.

        दूरदर्शनवर अनेक वाहिन्या आहेत. या वाहिन्यांवर आपल्याला            
 बातम्या, कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, कार्टून असे विविध कार्यक्रम दिसतात. आपल्या देशात प्रांतीय भाषा आहेत. त्या भाषेमध्ये सुद्धा या वाहिन्या असतात. तसेच जगातील घडामोडी पाहण्यासाठी वेगळ्या वाहिन्या असतात. आपल्याला सिनेमा, नाटक इ. वाहिन्या सुद्धा दिसतात. जगातील कुठलाही देश पाहता येतो व बसल्या जागेवर त्या देशात आपल्याला प्रवास करून आल्याचे सुख मिळते. आता तर गृहिणींना वेगवेगळे पदार्थ कसे बनवतात याची पाककला शिकवतात. तसेच लहान मुलांना चित्रकला, हस्तकला इ. कसे करायचे ते ही शिकवतात. त्याचप्रमाणे काही ज्ञान वाढवणारे, काही प्रश्नोत्तराचे कार्यक्रम दाखवतात. आपल्याला आपल्या देशातील धार्मिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळांची माहिती घरबसल्या कळते. जगात कुठे काय चालले आहे. याची माहिती आपणा

 त्वरितमिळते.अशाप्रकारे दूरदर्शन हे आपल्यासाठी वरदानच आहे.

        पण कधीतरी काही लोक सतत दूरदर्शनचे कार्यक्रम पाहात असतात. त्यांना त्यांचे आवडीचे कार्यक्रम पाहताना कुणी जरा तरी हटकले तर त्याचा राग अनावर होतो. जर कधी क्रिकेटची मॅच सुरू असेल तर मात्र क्रिकेटप्रेमी दूरदर्शनला खिळूनच बसलेले असतात. तसेच काही लहान मुले सतत कार्टून्स पाहात असतात. त्यावेळी मात्र त्यांची सवय सुटत नाही. सतत दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहिल्यामुळे डोळे, डोके इ. वर परिणाम होतो. डोळे लाल होतात. अभ्यास लक्षात  राहात नाही. डोके गरगरते. सतत झोप येते. आळस निर्माण होतो. मुलांना अगदी लहानपणीच डोळ्यांना चश्मा लागतो. त्यांना मैदानी खेळ आवडेनासे होतात. जर घरात कुणी आल तर ते त्यांना आवडत नाही. त्यांना सतत दुरदर्शचे कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात. अशा मुलांचे खाण्यापिण्याकडे लक्ष लागत नाही. अशीच स्थिति काहीशी मोठ्यांची देखील असते. सतत टी. वी. पाहणार्‍या माणसांची सतत चिडचिड होते व कधी कधी अशी माणसे स्वत:हून इतर आजारांना आमंत्रण देतात.


        बहुतेक घरांमध्ये दूरदर्शन चा एकच संच असतो. पण लहान मुलांना त्यांचे कार्यक्रम सतत पाहण्याचे आकर्षण असते. पण कधी कधी मोठ्या माणसांना स्वत:चे कार्यक्रम पाहायचे असतात. पण लहान मुले त्यांना ते पाहायला देत नाहीत. त्यावेळी जी गंमत असते ती मात्र वेगळीच असते. लहान मुले अशावेळी सतत रिमोट कंट्रोल स्वत:कडेच घेऊन असतात. कधी कधी तर लपवून ठेवतात. असा हा दूरदर्शनचा परिणाम घराघरामध्ये दिसून येतो.

        मित्रांनोअसे जर होत असेल तर दूरदर्शनला शाप म्हणाल का? नाही. जर मोठ्या माणसांनी स्वत:ला योग्य सवय लावून घेतली तर तुमच्या मुलांनासुद्धा योग्य ती चांगली सवय लागेल. एक म्हणजे मुलांना कुठल्यातरी त्यांच्या आवडत्या विषयात गुंतवून ठेवणे आवश्यक आहे व त्यात स्वत: पालकांचा सहभाग महत्वाचा आहे. तसेच मुलांशी दूरदर्शनमुळे होणारे दुष्परिणाम यांविषयी संवाद साधा. अगदी प्रेमाने हा विषय समजावून सांगा. मग पहा दूरदर्शन सर्वांसाठी शाप नसून वरदानच ठरेल

           
     दूरदर्शन शाप की वरदान

No comments: