गुरुपौर्णिमा
गुरुर्ब्र्म्हा
गुरुर्विष्णू: गुरु दैवो महेश्वरा : |
गुरु:
साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: |
गुरु
म्हणजेच ब्रम्ह, गुरु म्हणजेच विष्णू, गुरु म्हणजेच शिव व गुरु म्हणजेच साक्षात परब्रह्म अशा या ईश्वररूपी
गुरूंना माझा नमस्कार असो. आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच
गुरुपौर्णिमा. मराठी महिन्यातील आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
गुरु म्हणजे कोण?
Who is Guru?
गुरु
म्हणजे मार्गदर्शक. आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा मार्ग दाखवणारे ते
गुरु. आपले जीवन घडवणारे, आपल्यावर योग्य संस्कार
करणारे, आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे. आपल्यामध्ये शक्तीचा संचार करून कुठल्याही
प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत देणारे गुरुच असतात. आपल्या प्रत्येकाच्या
आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजेच आपले मातापिता होत. आपले संगोपन करतात. आपल्याला
बोलायला, चालायला शिकवतात. हाताला धरून उठवतात. आपल्या
मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी चांगल्या शाळेत घालतात. अशा प्रकारे आपले
आईवडील आपली काळजी घेतात. त्यामुळे आपले आईवडील आपले प्रथम गुरु होत. आपल्याला
शिकवणारे शिक्षक हे सुद्धा आपले गुरुच होत. आपण त्यांच्या सान्निध्यात दिवसातील
काही तासच असतो. परंतु शालेय शिक्षणाबरोबर ते आपल्याला इतरही ज्ञान देतात. म्हणून
प्रत्येक शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांना
फुलांचा गुच्छ, भेटवस्तू, मिठाई इ.
वस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात.
गुरूचा इतिहास :
History of Guru
गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही
म्हणतात. व्यासऋषींनी वेदांचे ज्ञान
सर्व
जगाला दिले. त्याच प्रमाणे त्यांनी
‘महाभारत’ हा पवित्र ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून त्यांनी जीवनाचे रहस्य सर्वांना समजावले.
म्हणूनच ते आद्यगुरू होत. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रथम व्यास ऋषींचे पूजन
केले जाते.
मानवी जीवनात गुरुची आवश्यकता :
(Need
of Guru in human life)
प्रत्येक
माणसाला कसली ना कसली तरी चिंता भेडसावत असते. जीवनात ज्यावेळी सुख येते त्यावेळी
माणूस आनंदी होतो. आपल्या सुखात हुरळून जातो. पण एखादे वेळेस वाईट प्रसंग आला तर
मात्र तो मनाने खचून जातो. आपल्यावर हा प्रसंग का आला? या प्रश्नाचे उत्तर शोधू लागतो. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर सापडत
नाही. काही जणांच्या मनात अशा वेळी वाईट विचार येऊ लागतात तर काही माणसे व्यसनाधीन
होतात. परंतु अशा बिकट प्रसंगी जर एखादा योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक मिळाला
तर माणसाला कुठच्याही प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मिळते व तो सुख किंवा दु:ख या
दोन्ही प्रसंगी मनाचा समतोल राखू शकतो. म्हणूनच धावपळीच्या या मानवी जीवनाला
गुरूंची आवश्यकता आहे.
खरा गुरु कोण?
Who is the Real Guru?
खरा
गुरु तोच असतो जो आपल्या शिष्याला प्रपंच सांभाळून त्याची उन्नती व अद्यात्मिक
प्रगती कशी होईल? यासाठी त्याला योग्य ती
साधना देतात. त्याचप्रमाणे शिष्य सुद्धा आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे आचरण करतो व
नम्रपणे वागतो. तोच शिष्य गुरुचाआशिर्वाद संपादन करतो. अशा प्रकारे गुरु आपल्या
शिष्याला ईश्वरी रूपात वेळोवेळी मदत
करतात. जो गुरु निस्वार्थी, निरपेक्ष राहून शिष्यांना मदत
करतो तोच खरा गुरु होय.
आजकाल समाजामध्ये गल्लोगल्ली बरेच बुवा, गुरु
सापडतात. एखाद्या संकटात असलेल्या माणसाला एखादा उपाय सांगून काहीतरी विधी
करण्यासाठी पैसे मागतात. अशा प्रकारे भरकटलेला माणूस आपले काम होईल या इच्छेने
आपला वेळ व पैसा वाया घालवतात. त्यामुळे आपण ज्यांना गुरु मानतो त्याची योग्यता
पडताळून घेणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच मित्रांनो, सावधान! कुणालाही
गुरु मानून कुठल्याही बुवांच्या नादी लागू नका, सत्कर्म करा.
या विश्वात एक अद्भुत शक्ती आहे तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ती शक्ती आपल्याला
योग्य गुरुच्या सहवासात प्राप्त होते. अशा प्रकारे गुरुपौर्णिमा आपल्या इष्ट
गुरूचे पूजन करून त्यांच्या उपदेशाप्रमाणे आचरण करा व इतरांना सहाय्य करा.
गुरुपौर्णिमा
English Translation
Gurupournima
Gururbrahma Gururvishnu: Guru Daivo Maheshwara: |
Guru: Sakshatparbrahm Tasmai Srigurve Nama: |
Guru is Brahma, Guru is Vishnu, Guru is Shiva and Guru is Parabrahma. Gurupournima is a day to express gratitude to your Guru. Gurupournima is celebrated on the full moon day of the Marathi month of Ashadh.
Who is Guru?
Guru(Teacher) is the guide. He is the Guru who shows us the path of knowledge from the darkness of ignorance. The ones who shape our lives, the ones who nurture us, the ones who show us the right path. We have gurus who dare to face any situation by transmitting power to us. The first Guru in the life of each of us was our parents. They take care of you. They teach you to walk. They hold our hands and to get up if we fell down. They send their children to good schools so that they can get a good education. This is how your parents take care of you. So our parents became our first gurus. The teacher who taught us was also our guru. We spend only a few hours a day with them. But along with school studies, they give us other knowledge too. So Gurupournima is celebrated in every school. On this day, students are given bouquets of flowers, gifts, sweets, etc to their teacher. They are honored by giving things.
History of Guru:
Gurupournima is also called Vyaspoornima. Vyasarishi gave the knowledge of Vedas to all the world. In the same way, he wrote the holy book 'Mahabharat'. Through this book, he explained the secret of life to everyone. That is why he became Adyaguru.(the first Guru) That is why the first Vyas sage is worshiped on the day of Gurupournima.
Need of Guru in human life:
Every human being has some kind of anxiety. Man is happy when there is happiness in life. He is overwhelmed by his happiness. But when bad things happen to him, he gets depressed. Why did this happen to you? The answer to this question begins to be found. He can't find the answer to his question. Some people have bad thoughts at such times, while others become addicted. But in such a difficult situation, if a guide is found to show the right path, a person gets the courage to face any situation and he can balance the mind in both happiness and sorrow. That is why this fast-paced human life needs a Guru.
Who is the Real Guru?
The real Guru is the one who takes care of his disciple's world and how will he progress and progress? They give him the right tools for this. In the same way, the disciple also obeys his master and behaves humbly. The same disciple acquires the Guru's blessing. Thus the Guru helps his disciple from time to time in the divine form. The true Guru is the one who helps the disciples selflessly and impartially.
In today's society, there are many Gurus in so many places. They ask for money to perform a ritual by telling a man in trouble a solution. Thus the wanderer wastes his time and money in the hope that his work will be done. Therefore, it is very important to verify the merits of those whom we consider being gurus. So friends, beware! Do not follow the advice of any person as a guru, do good deeds. Try to know that there is a wonderful power in this universe. That power we get in the company of the right Guru. In this way, celebrate Gurupournima by worshipping your respected Guru and follow his teachings and help others.