Marathi Essay on One Memorable Day in Rainy season
पावसाळ्यातील एक
दिवस
ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा !
ग्रीष्म ऋतुतील उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या
जीवांना ज्यावेळी आकाशात काळे काळे ढग दिसू लागतात. त्यावेळी मात्र सगळ्यांनाच
वरील बालगीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कधी एकदा पाऊस येतो व
कधी वातावरणात गारवा होतो असे होऊन जाते. फक्त माणसाचं नाहीत तर इतर प्राणिमात्रसुद्धा
पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. विशेष म्हणजे शेतकरी राजा तर जमिनीची मशागत करून
पेरणीची वाट पाहत असतो आणि ज्यावेळी पाऊस येतो मग काय! सगळ्यांनाच आनंद होतो. असा
हा पावसाळा माझ्यासाठी खूप विशेष असतो.
या वर्षी पावसाळा तसा वेळेवर सुरू झाला. जून
महिन्यात सुरूवातीला तसा खूप मोठा पाऊस येत नाही. यावेळी
सुद्धा पाऊस १० जूनला आला होता. त्यापूर्वी अधून मधून कधीतरी पावसाच्या सारी येत
होत्या. आम्हा मुलांची तर शाळा सुरू होते. त्यामुळे पावसाच्या या आनंदात आमची
शाळेचीही तयारी सुरू असते.
आमची शाळा १५ जूनला सुरू
होणार होती. पण हवामान खात्याने १४, १५ जूनला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली
होती. १५ जूनला मी शाळेत जायला निघाले त्यावेळी खूप मोठा पाऊस येईल अस वाटत नव्हत.
आभाळ आलेल होत. पण मी शाळेतून परत येईपर्यंत पाऊस येईल असा काही वाटत नव्हतं. कारण
पहिल्या दिवशी शाळा लवकर सुटते व पुस्तकांच खूप ओझं ही नसतं. मी शाळेत गेले. पहिला
तास संपला. अचानक वातावणात बदल झाला. वारा जोरात वाहू लागला. विजा चमकू लागल्या.
ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला. मी खिडकीतून बाहेर पहिले तर बाहेर अंधार दिसत होता व
मोठा पाऊस सुरू झाला. खिडकीची तावदाने सोसाट्याच्या वार्यामुळे वाजू लागली.
आमच्या शाळेच्या मैदानातील वडाच्या झाडाची एक फांदी मोडून पडली. अर्धा एक तास पाऊस
सुरूच होता. त्यानंतर पाऊस थोडा कमी झाला. विजा अधून मधून चमकत होत्या. थोड्या
वेळाने शाळा सुटली. मला खूप आनंद झाला.
मी व माझ्या मैत्रिणी घरी जायला निघालो.
शाळेच्या गेटवर आल्यानंतर अचानक पुन्हा काळोख झाला व पाऊस सुरू झाला. आमच्याकडे
कुणाकडेच छत्री नव्हती किंवा रेनकोट नव्हता. पण आम्हाला पावसात भिजायला मिळणार
याचा आनंद झाला. आम्ही पावसात भिजतचं निघालो. खूप मजा वाटत होती. वार्याच्या दिशेबरोबर
पावसाच्या सरी आमच्या अंगावर कोसळत होत्या. रस्त्यावर पाणी साचले होते. त्या
पाण्यात खेळत, हसत हसत आम्ही चाललो होतो. हाताने
एकमेकींच्या अंगावर पाणी उडवत होतो.
भिजून चिंब झाले होतो. विजा
चमकत होत्या. ढग गडगडत होते. पण आम्हाला मात्र त्याचे भान नव्हते. खूप मजा येत होती.
घरी जाऊच नये असे वाटत होते. पण उशीर झाला तर आई ओरडेल म्हणून आनंदात भिजत भिजत घरी
गेलो. मी घरी पोहोचले तेव्हा माझी आई छत्री घेऊन मला आणण्यासाठी निघत होती. मला भिजलेले
पाहिल्यावर ती विशेष काही बोलली नाही. तिने मला स्वच्छ हातपाय धुवून कपडे बदलायला संगितले
व मला गरम चहा दिला. पण माझ्या मनातला आनंद मात्र कमी होत नव्हता.
जर मी घरी असते तर
आईने मला पावसात भिजायला दिलेच नसते. आज माझी पावसात मनसोक्त भिजायची इच्छा पूर्ण झाली
होती.
अगदी नाच रे मोरा
आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच या गाण्यातील मोरासारखे.
No comments:
Post a Comment