फुलाचे
आत्मवृत्त
मी सुट्ट
मी
मी सुट्टीमध्ये कोकणात माझ्या गावी गेले होते. माझ्या घरच्या समोर आमची फुलांची बाग आहे. गुलाब, मोगरा, जास्वंद,
झेंडू इ. फुलांची झाडे आहेत. एकदा सकाळी उठल्यावर मी सहज बागेत फिरायला गेले होते.
एक सुंदर लाल रंगाचे गुलाबाचे फूल बघून मला आनंद झाला. मी सहज त्या फुलावरुन हात
फिरवला पण त्याचा काटा माझ्या बोटाला टोचला.
मी ओरडले. एवढ्यात
कुणाचा तरी हसण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी इकडे तिकडे बघितले पण पाहते तर
काय ते फुलच मला हसत होते. मला नवल वाटले.
फूल म्हणाले,
“ तुला आश्चर्य वाटले ना! “ माफ कर हं! मीच तुला हसले म्हणून. पण तू माझ्या पाकळ्यावरून
जो प्रेमाने हात फिरवलास. मला खूप बरे वाटले. तुला माझ्या मनातलं सांगावेसे
वाटले.” ते ऐकून मी बाजूलाच असलेल्या दगडावर बसले. फूल पुढे बोलू लागले, “मला पाहताच तुला फार आकर्षण वाटले. तुमची ही बाग
फुलांनी बहरून गेली आहे. आता थोड्या वेळाने तुझे आजोबा येतील त्यावेळी पूजेसाठी आम्हाला
तोडून नेतील देवघरात पूजेसाठी वापरतील आम्हाला देवाच्या पायावर वाहतील त्यावेळी
आम्हाला खूप अभिमान वाटतो. तुझी आजी मोगर्याचा गजरा करून केसात घालते. तेव्हा ती
आमच्यातील एक फूल ही केसात घालते. त्यानंतर आम्हाला विक्रीसाठी व्यापारी घेऊन
जातात. पण तुम्ही माणसे फुलांचा अगदी योग्य वापर करता. फुलांचे गुच्छ बनवता, समारंभात सजवटीसाठी वापरता. सौन्दर्य साधने , साबण, अत्तर इ. साठी वापर करता. औषधासाठी
फुलांचा वापर करता. हार बनवता,
गजरे बनवता, लग्न करणार्या जोडप्याच्या गळ्यात सुंदर
फुलांचे हार घालता. फुलांच्या सुंदर अगरबत्त्या तयार करता. आम्हाला त्यावेळी खूप
आनंद होतो.
पण ज्यावेळी मात्र आम्ही कोमेजतो, आमच्यातील सौन्दर्य कमी होते तेव्हा मात्र तुम्हीच
आम्हाला फेकून देता, पायदळी तुडवता. कचर्याच्या डब्यात
टाकता. देवचं निर्माल्य हे पवित्र मानले जात. पण तेही कुठे पाण्यात सोडायचे नाही म्हणून
काहीजण आम्हाला असेच कचर्यात फेकून देता. त्यावेळी मात्र आम्हाला दुख: होते.
आम्हाला वाटणारा अभिमान क्षणार्धात गळून जातो. पण तुम्ही आमची काळजी घेता योग्य वेळी आमची
लागवड करता म्हणून आम्ही आकर्षण व निरोगी असतो. याबद्दल मला तुमचे आभार मानायचे
वाटतात. पण त्याचबरोबर एक सल्लाही द्यावसा वाटतो की तुम्ही आमचा जरूर वापर करा. पण
आम्हाला उकीरड्यासारखे कुठेही फेकू नका. तुम्ही आम्हाला मातीत एक खड्डा करून किंवा
एखाद्या कुंडीत माती टाकून त्यात टाका. झाडाच्या मुळाशी टाका. त्यातून खत मिळेल व
शेतीसाठी ते तुम्हाला पुन्हा उपयोगी पडेल."
फुलाची ती करुण कहाणी ऐकून मला खूप वाईट वाटले
व मी त्याने
सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे वागायचे ठरवले व इतरांना ही तसे वागायला
भाग पाडेन असे ठरवून टाकले.
No comments:
Post a Comment