कोरोनाग्रस्त रुग्णाचे मनोगत
मी अनंत काळे. मुंबईला राहतो. मी एका खाजगी कंपनीत लिपिक
या पदावर कार्यरत आहे. कोवीड १९ कोरोना विषाणू चीनमध्ये आला आहे असे ऐकून होतो. पण
तो एवढ्या झपाट्याने जगभर पसरेल असे मात्र वाटले नव्हते. आपल्या देशात सुद्धा त्याचा शिरकाव कधी झाला हे
कळलेसुद्धा नाही. पण तरीसुद्धा कोणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. सर्वजण आपली
कामे रोजच्या प्रमाणे करत होते. मीही सुरूवातीला मास्क वापरत नव्हतो. पण ज्यावेळी
कोरोना मुंबईत पसरला तेव्हा मी थोडी काळजी घ्यायला सुरुवात केली. पण लगेचच सरकारने
ताळेबंदी जाहीर केली. रेल्वे
बंद झाल्या. आम्हाला ऑफिसने घरातून काम करायची परवानगी दिली. पण त्यानंतरच ४ ते ५ दिवस गेले असतील. मला सर्दी झाली, खोकला येऊ लागला व अंगात थोडा ताप आल्यासारखा वाटत होत.
पण साधी सर्दी असेल असं वाटलं. पण दुसर्या दिवशी महानगरपालिकेची माणसं माझ्या घरी
आली त्यावेळी कळलं की आमच्या ऑफिसमध्ये चहा आणणार्या मुलाला कोरोना झाला होता. मी
त्याच्या संपर्कात आलो होतो. म्हणून माझी कोरोना चाचणी केली गेली व ती पॉझिटिव्ह आली.
ते कळताच मला माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे झाले.
मला
हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. पण ज्यावेळी ही बातमी सगळीकडे पसरली.
त्यावेळी शेजारी व इतर इमारतीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सर्वजण माझ्याकडे
लांबूनच बघत होते. मला खूप अपराध्यासारखे वाटत होते. मला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.
माझ्यावर उपचार सुरू झाले. पण माझ्या मनात सतत विचार येत होते. माझ्यामुळे माझे कुटुंब
व माझ्या संपर्कातील काही जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. सुदैवाने ती निगेटिव्ह
आल्याचे कळले. मला हायसे वाटले. माझ्यामुळे आमच्या इमारतीला प्रतिबंधक क्षेत्र म्हणून
घोषित केले. लोकांना माझ्यामुळे त्रास सहन करावा
लागत आहे याची मला खंत वाटत होती. इकडे हॉस्पिटलमध्ये माझ्या आजूबाजूला कोविडचेच रुग्ण
होते. मी तिथे गेल्यानंतर २ ते ३ दिवसात एक रुग्ण दगावला. मला मनातून भीती वाटू लागली.
दोन दिवसांनी माझी दुसरी चाचणीसुद्धा पॉझिटिव्ह आली होती. मला वाईट वाटले. पण मी मनातून
खंबीर राहायचे ठरवले. माझी रोगप्रतिकारक शक्ती चांगली होती. त्यामुळे कोरोनावर मी नक्कीच
मात करीन याची मला खात्री होती. त्यानंतर मात्र माझ्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. मला
आनंद झाला. मी कोरोनामुक्त झालो होतो. आता डॉक्टरांनी मला घरी सोडायचे ठरवले. मला खूप
आनंद झाला. मला घरी सोडण्यात आले. घरी जाताना हॉस्पिटलच्या डॉक्टरर्स, नर्स इ. सर्वांना मला आनंदाने निरोप दिला.
पण घरी जात
असताना पुन्हा माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. मी तिथे गेल्यावर इमारतीतील रहिवाशांना
मला बघून काय वाटेल? त्यांची
प्रतिक्रिया काय असेल? मला घरी
जायला देतील की काही दिवस कुठेतरी विलगीकरण कक्षात राहा असे सांगतील. माझे मन साशंक
होते. जेव्हा मी गाडीतून उतरले, तेव्हा सुद्धा मनात धाकधूक होती. पण मी उतरताच सर्वांनी माझे
मोठ्या उत्साहाने स्वागत केले. सर्वांच्या चेहर्यावर आनंद होता. त्यांचे ते प्रेम
पाहून मी सर्वांचे आभार मानले. मी घरातच पुढील काही दिवस विलग राहण्याचे ठरवले. मी
घरात गेल्यावर माझ्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. हा एक गोष्ट इथे नमूद करतो की डॉक्टर्स, नर्स तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी स्वत:ची पर्वा
न करता अहोरात्र सेवा करत आहेत त्यांना मानाचा मुजरा.
मित्रांनो
, कोरोना झाला तर तो बराही होतो हे मी
स्वानुभवातून सांगतो. घाबरू नका. स्वत:ची काळजी घ्या. शासनाने दिलेले नियम पाळा. घरी
रहा. सुरक्षित रहा. मनाचीही ताकत वाढवा. जर प्रत्येकाने असे ठरवले तर कोरोना आपल्या
देशात फार काळ टिकणार नाही.
No comments:
Post a Comment