पृथ्वी बोलू लागली तर......
२२ एप्रिल जागतिक
वसुंधरा दिन यावर्षी परीक्षा झाल्यानंतर गावी जाऊन वृक्षारोपण करण्याचा मानस होता.
परंतु ताळेबंदीमुळे जाता आले नाही. मनाला खूप वाईट वाटले. अशा विचारात असताना माझा
कधी डोळा लागला कळलेच नाही आणि काय आश्चर्य! माझ्या समोर प्रत्यक्ष धरतीमाता उभी
होती. मी तिला नमस्कार केला. ती खूप खूश दिसत होती. मी तिला नमस्कार केला पण मनात
कसलीतरी खंत होती. मी तिला त्याबद्दल विचारले. तेव्हा ती बोलू लागली.
.......
ती म्हणाली,
“तुला आज का वाईट वाटले ते मला समजले. पण काळजी करत करू नकोस. सर्व काही ठीक होईल. तुला माहीत आहे की
माझ्या भूतला वर किती सजीव सृष्टी आहे. परंतु त्यात मला मनुष्या बद्दल फार अभिमान
आहे. त्याने आपल्या बुद्दीमत्तेच्या जोरावर
खूप प्रगति केली आहे.
त्याने आपले आयुष्य
सुखदायी व आराम दायी केले परंतु ते करत असताना मात्र त्याने इतर जीवसृष्टीचा, पर्यावरणाचा कधी विचार केला नाही. तू मला विचारत
होतीस ना हीच खंत माझ्या मनात आहे.
माणसाने आपल्या
स्वार्थापोटी मोठेमोठे कारखाने, इमारत,
बांध काम करण्यासाठी जंगले उध्वस्त केली. प्रदूषण वाढले. मी सर्व अन्याय सहन केला.
पर्यावरणाचा समतोल राखा, प्रदूषण थांबवा, अतिरेक करू नका. वृक्षा रोपण करा, असे वारंवार मी सांगून सुद्धा माणसाने माझे ऐकले
नाही.
पण आता मात्र चीनमध्ये जन्म झालेल्या
कोरोना विषाणू ने सर्व मानव जातीला सळो की पळो करून सोडले. सर्व कारभार थांबले.
प्राणहानी झाली. सगळे नुकसान झाले. मोठमोठे प्रगत देश
हवालदील झाले. आज माणसाने केलेली माणसाची हानी पाहून मला दुख: होत आहे.
आज उद्योग धंदे बंद झाल्यामुळे प्रदूषण
कमी झाले आहे. इतर जीव सृष्टी आनंदात आहे.
प्राणवायू चे प्रमाण
वाढले आहे. निसर्ग बहरून आला आहे. पण तुम्हाला
मात्र हा आनंद घेता येत नाही. घरात बसून रहावे लागले आहे. प्राणवायू असताना
तोंडे बांधून फिरावे लागत आहे.
निसर्गाचा आनंद तुम्हाला
घेता येत नाही. अशा या निसर्गा कडे पाहून मला खूशी वाटते.
पण तुम्हा सर्वां कडे पाहून मला फारच वाईट वाटत आहे. बाळांनो, तुमच्याच चुकीमुळे तुम्हाला भोगावे लागले आहे. परंतु
जेव्हा तुम्ही पुन्हा उद्योगधंदे सुरू कराल तेव्हा तुम्ही काळजी घ्या. आता तरी
शहाणे व्हा. तुम्ही सर्वांनी आनंदात रहा व इतरांना आनंदात ठेवा. भरपूर प्रगति करा
पण निसर्गाचा समतोल ढळू देऊ नका. तुम्ही व तुमच्या भावी पिढीला सुरक्षित ठेवा ही
कळकळीची विनंती करते”.
इतके बोलून धरती माता निघून गेली. मला
जाग आली पण धरती मातेचे ते बोल ऐकून माझे अंत:करण भरून आले.
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
No comments:
Post a Comment