expr:content='data:blog.isMobile ? "width=device-width,initial-scale=1.0,minimum-scale=1.0,maximum-scale=1.0" : "width=1100"' name='viewport'/> PRTutorial Marathi essay: Marathi Essay on Mala Pankh Asate Tar....

Friday, May 8, 2020

Marathi Essay on Mala Pankh Asate Tar....


                            
                               
            मला पंख असते तर ........                 Animation for Beginners: How to Animate a Flying Bird ...

कोवीड 19 कोरोना विष!णूचा जगभर संचार झाला आणि सगळीकडे   ताळेबंदी झाली. घरी बसा  सुरक्षीत रहा. तोंडाला मास्क लावा.  सुरक्षीत अंतर राखा.  हाथ साबण!ने सतत धुवा. कोरोनावर मात करा या सुचना सतत प्रसारमाध्यमातून देण्यात येत होत्या. घरी बसून खूपच कंटाळा आला होता. कोणीही बाहेर फिरत नव्हते. इतक्यात पक्षी किलबिल करत असल्याचे माझ्या कानावर आले आणि माझे लक्ष समोरच्या वडाच्या  झाड!कडे गेले. तिथे खूप पक्षी या फांदी वरून   त्या फांदीवर उडत होते. त्यांच्याकडे बघता बघता माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले आणि मी माझ्या कल्पना विश्वात रममाण झाले.

वाटले!  मला पंख  असते  तर ..............

मला पंख असते तर मला मुक्तपणे कोठेही जाता आले असते. माझ्यावर कोणतेही निर्बंध लादले गेले नसते. मला माझे मित्रआणि  नातेवाईक  यांच्या  घरी सहज जाता आले असते.  त्यांनी मला जरी घरात घेतले नसते  तरी मी त्यांच्याशी  लांबूनच गप्पा मारून आले असते.  तेवढेच मनाला समाधान वाटले असते.   आईलासुद्धा सर्वांची खुशालि  समजली असती, इतकेच काय मला माझ्या गावीदेखिल जाता आले असते. विनातिकीट, विनापरवाना मी गावी पोहोचले असते. गावातील रान मेवा, आंबा, कैरी, फणस, काजू इ. मला मनसोक्त  खाता आले असते.   गावी गेल्यावर मला कोठेही विलग होऊन  राहण्याची वेळ आली नसती  कारण कोरोना विष!णू माझ्या  संपर्कात येऊ  शकला  नसता.  अगदी ताळेबंदी  असेपर्यंत गावी आनंदात राहता  आले  असते.  खरच खुप मज्जा आली असती.

अशा  कल्पनेच्या विश्वात असतानाच मला आईने हाक मारली आणि मी भानावर आले.  पण या ताळेबंदीच्या काळात मला खरच पंख असते तर खुप बरे झाले असते असे मला वाटू लागले.




No comments: